संस्कृत शिकण्यासाठी लाईव्ह-ऑनलाईन वर्ग - ज्यात तज्ञ संस्कृत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहज आणि सोप्या पद्धतीने संस्कृतमध्ये स्वतःहून वाक्ये बनवायला शिका.
संस्कृत ही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे. संस्कृत भाषा म्हणजे प्राचीन भारतीय ज्ञानाचा मोठा खजिना उघडण्याची एक किल्ली आहे. वेद, भगवद्गीता, रामायण, उपनिषद, आयुर्वेद, चाणक्य नीती, ज्योतिषशास्त्र, किंवा इतर कोणतेही शास्त्र असो, संस्कृत शिकणे हे या शास्त्रांना किंवा ग्रंथांना मूळ आणि निःपक्षपाती स्वरूपात चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.
ह्या ऑनलाईन कार्यशाळेचा मुख्य उद्देश संस्कृत भाषेच्या मूलभूत गोष्टींचा परिचय थेट-प्रक्षेपित आणि परस्परसंवादी (लाईव्ह आणि इंटरॅक्टिव्ह) वर्गामध्ये करून देणे आहे. ज्यांना संस्कृतचे कोणतेही पूर्व ज्ञान नाही किंवा शाळा/महाविद्यालयात बऱ्याच वर्षांपूर्वी संस्कृत विषय होता अशांसाठी ही कार्यशाळा आहे. १० वर्षांवरील मुलांसाठी सुद्धा हे संस्कृत वर्ग खूप उपयोगी आहेत. तुम्ही तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या घरातून सहज समजण्यायोग्य पद्धतीने संस्कृत शिकू शकता.
संस्कृत वाक्य रचनेची ओळख करून घ्या
वर्गात शिकवलेले आपल्याला नीट समजले की नाही हे तपासण्यासाठी दर दिवशी ऑनलाईन परीक्षा आणि उजळणी
कर्ता, कर्म आणि क्रियापद असलेली सोपी वाक्ये बनवा
आधी संस्कृत न शिकलेल्यांसाठी उपयुक्त अशी कार्यशाळा
शर्वरीने संस्कृतमध्ये पदव्युत्तर शिक्षण (MA) प्राप्त केले आहे. मुंबई विद्यापीठातून वेदांतामध्ये विशेषज्ञता आहे. शर्वरीने संस्कृतमध्ये डिप्लोमा आणि तसेच बॅचलर पदवी मिळवली आहे जिथे ती तिच्या अभ्यासक्रमातील टॉपर्सपैकी एक होती. शर्वरी गेल्या सहा वर्षांपासून संस्कृत शिकवत असून तिने विविध देशांमधून आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवरुन आलेल्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवले आहे.
फेब्रु
२८
एका आठवड्याची कार्यशाळा
एका तासाचे ५ वर्ग
सोम ते शुक्र, रात्री ८ वा IST
कार्यशाळेचे वेळापत्रक:
२८ फेब्रु (सोम): रात्री ८ ते ९ वा. IST
१ मार्च (मंगळ): रात्री ८ ते ९ वा. IST
२ मार्च (बुध): रात्री ८ ते ९ वा. IST
३ मार्च (गुरु): रात्री ८ ते ९ वा. IST
४ मार्च (शुक्र): रात्री ८ ते ९ वा. IST
विद्यार्थी
रेटिंग
(ह्या आधी हीच कार्यशाळा इंग्रजीमध्ये घेण्यात आली होती)
The workshop was engaging and interestingly conducted by the instructor. She always tried to explain the same thing multiple times without getting annoyed. All the things were revised and all queries answered.
- Megha Rakesh Bhamare
These were excellent sessions. Can’t thank you enough. Sharvari is a gifted and blessed teacher. Blessed to learn from her.
- Sundara Krishnaswami
Excellent program. Now I could talk in Sanskrit with small sentences.
- Suvarna Sudagoni
Time-bound, well-structured program for the absolute beginners who had no prior knowledge of Sanskrit, and after the workshop most of them have started liking the language and are eager to learn it further through Open Pathshala.
- Subhabrata Barman
Liked the method of teaching along with the nicely prepared workshop material. The workshop is very nicely organized. Thanks.
- Dr.Vasudev Halliyal
कार्यशाळेत नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करा
वर्गाच्या सूचना मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
WhatsApp आणि ईमेलद्वारे दिलेल्या लिंकचा वापर करून झूम लाईव्ह वर्गामध्ये सहभागी व्हा
लाईव्ह झूम विडिओ कॉल वर संस्कृत शिका आणि शिक्षकांना थेट प्रश्न विचारा
१-आठवडा कालावधी. थेट-संवादात्मक वर्ग सोमवार ते शुक्रवार
प्रत्येक सत्राच्या शेवटी शंका/प्रश्न विचारा
प्रत्येक वर्गाच्या शेवटी एक लहानशी ऑनलाईन परीक्षा
प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्र
६ महिन्यांच्या कालावधीसाठी रेकॉर्ड केलेले वर्ग उपलब्ध
एक अतिशय व्यावहारिक आणि खेळकर अभ्यासक्रम ज्यामध्ये खालील विषयांचा समावेश आहे:
दिवस १स्वतःचा परिचय
मित्राचा परिचय
दिवस २ आठवड्याचे दिवस
आज, उद्या, काल कसे म्हणावे. साधी एकवचनी आणि अनेकवचनी वाक्ये बनवणे
दिवस ३वाक्यात क्रियापदांचा वापर
एखाद्या गोष्टीचे स्थान सूचित करणे
संख्या, शब्दांचे लिंग
दिवस ४सर्वनामांचा वापर - तो/ती/ते
वेळ सांगणे. वाक्यात आहे/नाही याचा वापर
दिवस ५ कर्ता-कर्म-क्रियापद वापरून संस्कृतमध्ये लहान-लहान वाक्ये तयार करणे.
सुभाषितम् (subhāṣitam) - एक सोपा संस्कृत श्लोक स्वतःहून समजून घेणे
ही कार्यशाळा तुम्हाला संस्कृत भाषेच्या मूलभूत गोष्टींची ओळख करून देईल (बेसिक संस्कृत शिकण्यासाठी). संस्कृतची वाक्यरचना नक्की कशी आहे याची कल्पना येईल आणि तुम्हाला स्वतःहून लहान अर्थपूर्ण वाक्ये तयार करणे शक्य होईल.
तुम्ही कार्यशाळेचे शुल्क (फी) भरून तुमचा सहभाग निश्चित केला की तुम्हाला एका WhatsApp ग्रुपमध्ये जोडले जाईल जिथे दर दिवशी सर्व तपशील कळवले जातील.
वर्ग Zoom Meetings App द्वारे होतील. WhatsApp आणि ई-मेल द्वारे Zoom लिंक तसेच PDF नोट्स पाठवल्या जातील.
सोमवार २७ फेब्रुवारी पासून वर्ग सुरु होईल. सोमवार ते शुक्रवार - संध्याकाळी ८ ते ९ वाजता - असे ५ दिवस सलग वर्ग होतील. ही एका आठवड्याची कार्यशाळा आहे.
प्रत्येक वर्गाच्या शेवटी, आम्ही शंकांचे निरसन करण्यासाठी थोडा वेळ देऊ.
प्रत्येक वर्ग रेकॉर्ड केला जाईल आणि वर्ग होईल त्याच दिवशी रात्री तुम्हाला रेकॉर्ड केलेल्या क्लास ची लिंक WhatsApp आणि ई-मेल वर मिळेल. हे रेकॉर्ड केलेले वर्ग तुम्ही ६ महिन्यांच्या कालावधीपर्यंत पाहू शकता
होय, प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) मिळेल.
हो, प्रत्येक वर्गाच्या अखेरीस एक छोटी ऑनलाईन चाचणी आयोजित केली जाईल ज्याने त्या वर्गात शिकवलेलं समजलं आहे की नाही हे कळेल.
नाही, कोणत्याही पूर्वतयारीची आवश्यकता नाही. शिकवण्याचे माध्यम मराठी असणार आहे.
नाही,WhatsApp ग्रुप वर सामील होणे ऐच्छिक आहे. सर्व माहिती ई-मेल द्वारे देखील पाठवली जाईल.
हो, १० वर्षावरील मुले ह्या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.
नाही. भगवद्गीता, उपनिषद आणि वेद स्वतःहून समजण्यासाठी काही वर्षांचा (३ ते ६) अभ्यास आवश्यक आहे. ही कार्यशाळा अशांसाठी आहे ज्यांनी आधी कधी संस्कृत चा अभ्यास केला नाही किंवा ज्यांना संस्कृत भाषा शिकायला सुरुवात करायची आहे.
नाही. पण प्रत्येक वर्गाच्या आधी तुम्हाला PDF नोट्स देण्यात येतील. शेवटच्या वर्गात तुम्हाला काही पुस्तकांची यादी देण्यात येईल जी तुम्ही विकत घेऊ शकता.
ह्या कार्यशाळेत, मराठी भाषेत शिकवले जाईल. प्रश्नोत्तरे सुद्धा मराठी मध्ये होतील.
नाही, एकदा भरलेले शुल्क / फी कोणत्याही कारणाने परत केली जाणार नाही.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी, आम्ही तुम्हाला संदर्भ पुस्तकांची यादी पाठवू जे तुम्ही विकत घेऊ शकता.
नाही, डेमो क्लास उपलब्ध नाही.